Skip to main content

Posts

Showing posts from July, 2019

खजिना

गावभागातल्या त्या अरुंद गल्ली बोळातून राधिकाची सायकल सुसाट धावत होती,अडथळा आला किंवा वाटेत कोणी आलं तर "ओSSSओSSS बाजूला सरका,बाजूला सरका ब्रेक नाहीSS ब्रेक नाहीSS" ही तिची लांडगा आला रे आला ची ओरड आता लोकांना सवयीची झाली होती.लोक पण उनाड पोर आहे म्हणून हसून सोडून देत बाजूला व्हायचे तर काही जण, थांब तुझ्या बापाला आज सांगतोच म्हणत तिला दम द्यायला पुढे यायचे...पण ती ऐकतेय कुठली,आपल्या दररोजच्या धुंदीत ती जोरात सायकल पळवत होती.मुलगी म्हणून राधिकाच्या बापाने तिला कधीच बांधून ठेवली नाही,खेडेगावात राहत असून सुद्धा 7 च्या आत घरात चा नियम लावला नाही किंवा तु मुलगी आहेस म्हणून तू असंच उभं राहिलं पाहिजेस,असंच बसलं पाहिजे,असेच कपडे घातले पाहिजेत,स्वयंपाक आलाच पाहिजे, असे कुठल्याही प्रकारचे समाजाने तयार केलेले अलिखित नियम लादले नाहीत.सायकल विकत घ्यायला गेल्यावर पण तुला जी हवी ती सायकल तू निवड म्हणून सांगितले,राधिकाला ती आडव्या बार ची Hercules ची  काळ्या रंगाची 26 इंचाची Axn Dx आवडली,मुलगी आहेस तुला ही सायकल चालवायला नाही जमणार असा तिचा बाप एका अक्षरानेसुद्धा बोलला नाही,पैशाच्या बाबतीत त्य

तो,ती आणि पाऊस

पाऊस पडायला लागला की तिची आठवण हमखास यायची.कारणच तसं होतं...पावसामध्येच तर तिने त्याला विचारलेलं.त्यांच्या कॉलेज पासून जेमतेम 2-3 किलोमीटर वर असेल तो धबधबा...एरवी उन्हाळ्यात पिरबाबाचा तो काळा खडक ओबडधोबड,निर्जीव आणि निस्तेज दिसायचा पण पाऊस सुरू झाला की मात्र त्याला नवीनच ऐट चढायचा.श्रावणात तर वरपासून खालपर्यंत हिरव्या गवताची चादर घेऊन पावसाची साद घेत तो पिरबाबाचा धबधबा जानेवारीच्या अखेरपर्यंत तर अखंड कोसळत असायचा.  ऑफिस नुकतंच सुटलेलं होतं पण त्याला यावेळी पावसात एकटं नव्हतं भिजायचं.गेल्या पाच वर्षांमधला हा एकच पावसाळा असा होता की ज्यावेळी तो एकटा होता.इराणी कॅफे मध्ये बसल्यावर समोर वाफाळलेला चहा आलेला,पण या वेळी कुरकुरीत कांदा भज्यांच्या ऐवजी ती एक्सट्रा फायबर असलेली बेचव बिस्किटे सोबत होती. मन बंड करून उठत होत.थोड्याश्या गडबडीत अधाशीपणेच चहा घेत त्याने सुज्या ला फोन लावला.सुज्या ने फोन उचलताच आपल्या कोल्हापुरी सुसभ्यपणाचे दर्शन देत "बोल की भावा"म्हटले आणि दोघे पुढच्या अर्ध्यातासात त्या पिरबाबाच्या डोंगराकडे बाईक वरून निघाले सुद्धा.आकाशात दाटून आलेल्या त्या काळया ढगांना पण