Skip to main content

Posts

Showing posts from August, 2015
                                संवेदनशुन्यतेकडे वाटचाल                                       २५ एप्रिल २०१५ हा दिवस नेपाळ च्या इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून गणला जाईल.नेपाळ सोबतच शेजारच्या देशांना हादरवून सोडणाऱ्या या भूकंपाने सगळ्यांचीच मने काळजीत पाडली.जवळपास ७००० लोक मृत्युमुखी पडले तर १७००० च्या वर माणसे जखमी झाली. या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच १२ मे रोजी दुसरा धक्का बसला.मानवाने स्वतःच्या सामर्थ्यावर कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या बलाढ्य सामर्थ्यशाली शक्तीसमोर काहीच चालत नाही हेच खरे.                     भूकंपपीडितांसाठी जगभरातून मदतीचे हात पुढे सरसावले.”वसुधैव कुटुंबकम” चा खरा अर्थ यातून स्पष्ट होतो.परंतु या सर्वामध्ये एक लाजिरवाणी गोष्ट समोर येते ती म्हणजे तंत्रज्ञानाच्या जास्त वापराबरोबरच माणसांमधील संवेदना हरवत चालेली आहे.भूकंप झाल्यानंतर २-३ दिवसांतच कोसळलेल्या धराहार मनोऱ्यासमोरील लोकांचे ‘सेल्फी’ प्रदर्शित होऊ लागले.नेपाळच्या संस्कृतीचा प्रतीक असलेला धराहार कोसळला आणि लोक त्याच्या समोर जाऊन सेल्फी काढू लागले. ही कुठल्या प्रकारची नैतीकता म्हणायची?