संवेदनशुन्यतेकडे वाटचाल
२५ एप्रिल २०१५ हा दिवस नेपाळ च्या इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून गणला जाईल.नेपाळ
सोबतच शेजारच्या देशांना हादरवून सोडणाऱ्या या भूकंपाने सगळ्यांचीच मने काळजीत
पाडली.जवळपास ७००० लोक मृत्युमुखी पडले तर १७००० च्या वर माणसे जखमी झाली. या धक्क्यातून
सावरतो न सावरतो तोच १२ मे रोजी दुसरा धक्का बसला.मानवाने स्वतःच्या सामर्थ्यावर
कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या बलाढ्य सामर्थ्यशाली शक्तीसमोर काहीच चालत
नाही हेच खरे.
भूकंपपीडितांसाठी जगभरातून मदतीचे हात पुढे सरसावले.”वसुधैव कुटुंबकम” चा खरा अर्थ यातून स्पष्ट होतो.परंतु या सर्वामध्ये एक लाजिरवाणी गोष्ट समोर येते ती म्हणजे तंत्रज्ञानाच्या जास्त वापराबरोबरच माणसांमधील संवेदना हरवत चालेली आहे.भूकंप झाल्यानंतर २-३ दिवसांतच कोसळलेल्या धराहार मनोऱ्यासमोरील लोकांचे ‘सेल्फी’ प्रदर्शित होऊ लागले.नेपाळच्या संस्कृतीचा प्रतीक असलेला धराहार कोसळला आणि लोक त्याच्या समोर जाऊन सेल्फी काढू लागले. ही कुठल्या प्रकारची नैतीकता म्हणायची?
भूकंपपीडितांसाठी जगभरातून मदतीचे हात पुढे सरसावले.”वसुधैव कुटुंबकम” चा खरा अर्थ यातून स्पष्ट होतो.परंतु या सर्वामध्ये एक लाजिरवाणी गोष्ट समोर येते ती म्हणजे तंत्रज्ञानाच्या जास्त वापराबरोबरच माणसांमधील संवेदना हरवत चालेली आहे.भूकंप झाल्यानंतर २-३ दिवसांतच कोसळलेल्या धराहार मनोऱ्यासमोरील लोकांचे ‘सेल्फी’ प्रदर्शित होऊ लागले.नेपाळच्या संस्कृतीचा प्रतीक असलेला धराहार कोसळला आणि लोक त्याच्या समोर जाऊन सेल्फी काढू लागले. ही कुठल्या प्रकारची नैतीकता म्हणायची?
हे सर्व एवढ्यावरच थांबत नाही तर विविध
मेसेंजरच्या माध्यमातून विविध संदेश फिरू लागले कि ,“आता मोबाईल व्हायब्रेट झाला
तरी भीती वाटते-एक नेपाळी” तर काही भूकंपसूचक यंत्राची चित्रे फिरू लागली, जसे कि
दोन उपड्या ठेवलेल्या ग्लासांवरती एक ताट ठेवले आहे, हे म्हणे भूकंपसूचक यंत्र
.अशा प्रकारचा एखादा मेसेज जर एखाद्या भूकंपपीडिताकडे किंवा त्याच्या नातेवाईकाकडे
गेला असेल तर त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही.
भारताकडे नेपाळचा सख्खा शेजारी म्हणून पहिले जाते.(काही जनांच्या मनात ही
संज्ञा ‘मोठा भाऊ’ अशी सुद्धा असू शकेल.) भूकंपानंतर ६ तासांच्या आत नेपाळमध्ये भारताची मदत पोहोचली.भारतीयांच्या संवेदनशीलतेचे
उदाहरण ऑस्ट्रेलियामध्ये सुध्दा सापडते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे रस्त्यावर
एका मुलाला अपघात झाला तेथेच जवळ असणाऱ्या सरदारजीने रक्तस्राव थांबवण्यासाठी
स्वतःच्या डोक्यावरील साफ्याचे कापड काढून जखमेवर बांधले. इथे त्या सरदारजीचा धर्म
आडवा आला नाही,तर दिसून आली ती भारतीय संस्कृतीची शिकवण ‘माणुसकी’.हीच माणुसकी
त्या संदेश फिरवणाऱ्या लोकांमधून हरवल्याची दिसून येते.
'सोशल मीडियाच्या’ गैरवापराचे अजून एक
उदाहरण दिसून येते ते म्हणजे विश्वचषक २०१५ मध्ये भारताचा उपांत्य सामन्यात झालेला
पराभव.मुळात पराभवाला जबाबदार कारणे वेगळीच पण खापर फोडले गेले अनुष्का
शर्मावर.म्हणे की, ‘अनुष्का तिथे आली म्हणून भारत सामना हरला’ ,अनुष्काने विराटला
लवकर ये म्हणून बोलावले म्हणून विराट १ धाव काढून बाद झाला.पुरुषप्रधान
संस्कृतीमध्ये कुठल्याही चुकीचे खापर स्त्रीवर फोडले जाने ही तर भारतीयांमध्ये एक
चुकीची रीतच होऊन बसली आहे(पण सगळेच भारतीय असे नाहीत !!!! ).
सोशल मीडीयाच्या माध्यामातुन समाजाची ‘जडणघडण’ कुठल्याप्रकारे होत आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.ही माध्यमे केवळ एवढ्यावरच बोलून थांबत नाहीत तर ‘Right to freedom of expression’ चे बोध जोडून पळ काढतात. भारतीय संविधानाने आम्हाला हक्क दिलाय बोलायचा तुम्ही कोण आमच्या हक्कांवर गदा आणणारे?
इंटरनेटच्या वापरामुळे माणूस माणसापासून
दूर गेलाय परंतु virtually खुप
जवळ आलाय.म्हणूनच यापुढे सोशल मीडीयाच्या माध्यामातुन संदेश पाठवताना विचार करायला
हवा की,या संदेशामुळे माणसामधली ‘माणुसकी’ आणि ‘संवेदना’ तर हरवणार नाही ना?
नाहीतर काही दिवसांनी असे म्हणावे लागेल की ‘माणुसकी’ आणि 'संवेदना' हे शब्द केवळ
आता शब्दकोशातच सापडतात.
Comments
Post a Comment