संवेदनशुन्यतेकडे वाटचाल २५ एप्रिल २०१५ हा दिवस नेपाळ च्या इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून गणला जाईल.नेपाळ सोबतच शेजारच्या देशांना हादरवून सोडणाऱ्या या भूकंपाने सगळ्यांचीच मने काळजीत पाडली.जवळपास ७००० लोक मृत्युमुखी पडले तर १७००० च्या वर माणसे जखमी झाली. या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच १२ मे रोजी दुसरा धक्का बसला.मानवाने स्वतःच्या सामर्थ्यावर कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या बलाढ्य सामर्थ्यशाली शक्तीसमोर काहीच चालत नाही हेच खरे. भूकंपपीडितांसाठी जगभरातून मदतीचे हात पुढे सरसावले.”वसुधैव कुटुंबकम” चा खरा अर्थ यातून स्पष्ट होतो.परंतु या सर्वामध्ये एक लाजिरवाणी गोष्ट समोर येते ती म्हणजे तंत्रज्ञानाच्या जास्त वापराबरोबरच माणसांमधील संवेदना हरवत चालेली आहे.भूकंप झाल्य...