दुर्ग भ्रमंती आणि ती सुद्धा सह्याद्रीच्या पायघड्यांवर ही केवळ मराठी माणसासाठीच नवे तर प्रत्येक भारतीयाला मिळालेली एक निसर्गाची देणगीच आहे.विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये राहणाऱ्या ' घाटी ' लोकांकरिता भारताच्या पश्चिम घाटावर कातळ काड्यांनी नटलेला हा सह्याद्री म्हणजे अरबी समुद्र आणि सह्याद्रीचे पठार यामधला एक विभाजक.पठारी प्रदेशातून कोकणात उतरण्यासाठी घाटामधुन प्रवास करावा लागतो. अशाच या विभाजाक सह्याद्रीची साक्ष देत "किल्ले वासोटा" आजतागायत त्याच दिमाखात उभा आहे.मुळात वासोट्यावर उभे राहिल्यावर पश्चिमेकडे असणारा चिपळूण आणि पूर्वेकडे दिसणारा सह्याद्रीचा पठारी प्रदेश पाहून महाराष्ट्राची निसर्ग संपन्नता दिसून येते. शिलाहारकालीन राजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.वासोट्याचे नाव शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्...